स्थापना - औरंगाबाद दि. १३/१०/२००७
नोंदणी क्रमांक. महा/१६०४/०७

आमच्या बाबत...

वंदे मातरम !!!


सगळीकडे तरुणाईच्या कामावरचा विश्वास उड्त चालला आहे तरुणांच्या भावना समजावून घेण्यासाठी, त्यांच्या कार्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सारख्यांची गरज आहे हे कार्य आपण निश्चीत कराल असा विश्वास आमच्या मनात आहे.

तरुणाईचा उपयोग हा हात उगारण्यासाठी नसून उभारणीसाठी आहे आम्ही सामाजिक बांधीलकीची जपवणुक करीत या राज्यातील विविध शहरांतील १३९ तरुणांना एकत्रित करुन "आशीर्वाद बहुउद्देशीय संस्थेची" स्थापना १३ दिसेंबर २००७ रोजी सोलापुर धर्मदाय आयुक्त यांच्या मार्फ़त केली आहे संस्थेमध्ये सर्व भारतीयांना समान स्थान असुन संस्था कोणत्याही विशिष्ठ धर्म किंवा जातीकडे झुकलेली नाही प्रसिध्दीच्या मागे न लागता सिध्दीवर विश्वास ठेवून भारतमाता हेच संस्थेचे दैवत तर राष्ट्रागीत हीच संस्थेची प्रेरणा आहे.

गेल्या तीन वर्षापासून आम्ही सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक, सांस्क्रुतिक, आरोग्य, अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत शहर तसेच ग्रामीण भागातील समस्यांवरतीदेखील आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.

"संसार मोडुनी पडला, नाही मोडला कणा,
पाठीवर हात ठेवुनी, फ़क्त लढ म्हणा...."एवढीच अपेक्षा आम्ही आपणांकडुन करत आहोत. देवाकडे जातांना वाटेवरती देश लागतो यावरती गाढ विश्वास ठेवुन हे राष्ट्र सुजलाम सुफ़लाम करण्यासाठी आम्ही निमित्तमात्र ठरणार आहोत यातच आम्हाला आनंद आहे.


Certificate