स्थापना - औरंगाबाद दि. १३/१०/२००७
नोंदणी क्रमांक. महा/१६०४/०७

आमची कार्ये...

संस्थेची नियमित कार्ये

वर्षातुन ३ ते ४ रक्तदान शिबिरे आयोजित करणे.
एज्युकेशनल सेमिनार्स तसेच सांस्क्रुतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
स्मा्र्ट आशीर्वाद हि स्पर्धा परिक्षा घेणे.
सर्व उत्सव व जयंत्या साजर्‍या करणे.
दर गुरुवारी आशीर्वाद विवेक केंद्र भरवुन सामाजिक कार्यास प्रोत्साहन देणे.
व्रुक्षारोपण करणे.
गरजुंना आर्थिक मदत व आवश्यक वस्तुंचे वाटप करणे.
पंढरपुरला जाणार्‍या वारकर्‍यांना मदत करणे.


मागील काही वर्षातील संस्थेच्या कार्याचा थोड्क्यात आढावा


मे २००६ मध्ये मातोश्री व्रुध्दाश्रम, औरंगाबाद येथे फ़ळवाटप.

मे २००७ मध्ये मदर तेरेसा व्रुध्दाश्रम, औरंगाबाद येथे फ़ळवाटप.

सप्टेंबर २००७ मध्ये आरोग्य वि्षयक सेमिनार औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला.

३० डिसेंबर २००७ रोजी नाशिक येथे संस्था रजिस्टर झाल्याच्या निमित्ताने एक सेमिनार आयोजित करण्यात आला यामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबीर तसेच मेडीकल, एज्युकेशनल इत्यादी विषय हाताळण्यात आले.

रु ३०,०००/- संस्थेच्या कार्यकर्त्यास शैक्षणिक कामासाठी मदत म्हणुन देण्यात आले. (जानेवारी २००८)

जुन २००८ मध्ये संस्थेची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने "आशीर्वाद युवा मंच" ची स्थापना खडकी, जिल्हा बीड या गावामध्ये करण्यात आली तसेच यानिमित्ताने शाळेतील २४० विद्यार्थ्याना मोफ़त शालेय बगचे वाटप करण्यात आले अनेक स्पर्धा घेउन बक्षीस वितरण आणि शालेय परिसरामध्ये व्रुक्षारोपण करण्यात आले.

गणेशोत्सव २००८ चे औचित्य साधुन मतोश्रीनगर, औरंगाबाद येथे संगीत खुर्ची, रांगोळी, एक मिनिट स्पर्धा घेउन सिनेपत्रकार मा श्री अशोक उजळंबकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच मंडळाच्या ४० बाळगोपाळांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले.

आगस्ट २००८ मध्ये संस्थेच्या सभासदांच्या उन्नतीच्या द्रुष्टीने स्मार्ट २००८ अशी परिक्षा घेण्यात आली.

प्रथम वर्धापन दिनानिमित्त (२८ डिसेंबर २००८, औरंगाबाद) अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

शेअर मार्केट डिटेल्स : लोके मडम यांचे व्याख्यान.
शैक्षणिक कोर्सेसची माहिती : मणिपाल इन्सिटयुट.
हास्यदरबार हा एकपात्री सांस्क्रुतीक कार्यक्रम, तापडिया नाटय मंदिर, औरंगाबाद येथे सुप्रसिध्द विनोदी कलाकार दिलीप खन्ना यांनी सादर केला.
धमाल लग्नांची हा तुफ़ान विनोदी कार्यक्रम मारोती करांडे यांनी सादर केला.

स्मार्ट २००८ या पारितोषिकाचे वितरण देखील करण्यात आले यावेळी संस्थेतर्फ़े रक्तदान शिबिर भरवण्याचे आश्वासन देण्यात आले.

२६ जानेवारी २००९ रोजी "आशीर्वाद युवा मंच" ची दुसरी शाखा तारदाळ, ता हातकणंगले जि कोल्हापुर येथे स्थापन करण्यात आली ३५ तरुणांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारले शाळेत खाउ वाटप करण्यात आला.

१४ एप्रिल २००९ रोजी "आशीर्वाद युवा मंच" शाखा तारदाळतर्फ़े आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी आंबेडकरांच्या कार्यशैलीचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

रु १५,०००/- व १०,०००/- अशी गरजूंना संस्थेतर्फ़े शैक्षणिक मदत करण्यात आली.

३ मे २००९ रोजी संस्थेतर्फ़े रक्तदान शिबिर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले ६० जणांनी रक्तदान करुन मोलाचे सहकार्य केले शहरातील अनेक शिबिर आयोजकांचा संस्थेतर्फ़े गौरव करण्यात आला.

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी फ़ळ वाटपाचा कार्यक्रम.

गणेशोत्सव २००९ चे औचित्य साधून मातोश्री गणेश मंडळ, औरंगाबाद येथे विविध स्पर्धा आयोजित करुन बक्षिसे वितरण करण्यात आली मातोश्री गणेश मंडळ व आशीर्वाद बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यात ३१ जणांनी रक्तदान केले."संसार मोडुनी पडला, नाही मोडला कणा,
पाठीवर हात ठेवुनी, फ़क्त लढ म्हणा...."